Pimpri News: कोरोनाची तीव्रता कमी, महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना उद्यापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची तीव्रता कमी झाली असून पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आस्थपनेवरील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना उद्या (बुधवार) पासून थम्ब इम्प्रेशन, फेस रिडिंग मशिनद्वारे बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक, सक्तीची करण्यात आली. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना थम्ब इम्प्रेशनमधून सवलत देण्यात आली होती. तथापि, आता कोरोनाची तीव्रता कमी झाली असून पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण देखील कमी झाली आहे. याशिवाय सर्व शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थितीमध्ये सुरु करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे महापालिकेची सर्व कार्यालये, विभाग हे 100 टक्के उपस्थितीमध्ये सुरु झाले आहेत.

महापालिकेच्या अस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना 1 सप्टेंबर 2021 पासून थम्ब इम्प्रेशन, फेस रिडिंग मशिनद्वारे बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक, सक्तीची करण्यात आली. ज्या ठिकाणी कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. या ठिकाणी बायोमेट्रीक उपस्थिती नोंदविणे बंधनकारक राहील. थम्ब इम्प्रेशन करताना सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.