Maval Corona Update : मावळात  31 रुग्णांची नोंद; 14 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

Maval recorded 31 patients; Discharge of 14 persons, death of three : सध्या रुग्णालयात 196 आणि होम आयसोलेशनमध्ये 204 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 29) 31 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण आकडा 671 झाला आहे. तर आज 14 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी दिवसभरात मावळ तालुक्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 19 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 12 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये कामशेत, वराळे, उर्से, कुसगाव म पा येथील प्रत्येकी दोन तर धामणे, सोमाटणे, साते, दारूम्ब्रे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

शहरी भागात सापडलेल्या 18 रुग्णांपैकी 10 रुग्ण तळेगाव शहरातील आहेत. लोणावळा शहरातील 6 रुग्ण आहेत. तर वडगाव नगर पंचायत क्षेत्रात आज तीन रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण 671 रुग्णांमध्ये सध्या 400 रुग्ण सक्रीय आहेत. तर 254 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयात 196 आणि होम आयसोलेशनमध्ये 204 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.