Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 29 नवीन रुग्ण

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 18 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 11 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरुवारी, दि. 27) कोरोनाचे 29 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 854 झाली आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 18 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 11 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सोमाटणे, चिखलसे येथील प्रत्येकी दोन, कुसगाव बु. धामणे, गहुंजे, शिलाटणे, नायगाव, मळवली ना मा, वरसोली येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 17, लोणावळा शहरात 1 रुग्ण आढळून आला आहे. वडगावमध्ये आज एकही रुग्णाची नोंद झाली नाही.

एकूण 1 हजार 854 रुग्णांमध्ये सध्या 413 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 365 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 629, लोणावळा नगरपरिषद 216 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 124 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 885 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.