Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 21 नवीन कोरोना रुग्णांची नोंद; एक मृत्यू

एका जेष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड  वैद्यकीय विभागाच्यावतीने देण्यात आली.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत आज, गुरुवारी दत्तनगर आणि चिंचोली येथे प्रत्येकी 3, गांधीनगर आणि किन्हई येथे प्रत्येकी 4, इंद्रपूरम आणि नायडूनगर येथे 2, शेलारवाडी, इंद्रप्रस्थ बिल्डिंग आणि आंबेडकर नगर येथे प्रत्येकी 1 अशा एकूण 21 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर एका जेष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड  वैद्यकीय विभागाच्यावतीने देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 770 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 21 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 770 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 27 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 47 रुग्णांना, हिंजवडी येथील विप्रो कोविड केअर सेंटर आणि देहूगावातील कोविड केअर सेंटर येथे प्रत्येकी एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

76 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आज 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 598 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर आंबेडकर नगर येथील 65  वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 20 इतकी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.