Weather Report: विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या २४ तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: रत्नागिरी, सावंतवाडी 3 प्रत्येकी, भिरा, पेण 2 प्रत्येकी, कल्याण, माथेरान, मुरुड, पेडणे, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, सुधागड पाली, ठाणे 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: पाथर्डी 6, बार्शी 3, महाबळेश्वर, सांगोला 2 प्रत्येकी, गगनबावडा, इगतपुरी, नेवासा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: पारंडा 5, धारूर 4, बीड, हिमायतनगर, कळंब, परभणी, पूर्णा 3 प्रत्येकी, आष्टी, शिरूर कासार 2 प्रत्येकी, अंबड, औसा, केज, मंथा, मुदखेड, नांदेड, पाटोदा 1 प्रत्येकी.

विदर्भ: अहीरी, आमगाव, भामरागड, देवरी, धानोरा, एटापल्ली, गोंदिया, कोरची, कुरखेडा, लाखनी, सालेकसा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : शिरगाव, डोंगरवाडी 3 प्रत्येकी, अम्बोणे, दावडी, कोयना (पोफळी),  खोपोली, ताम्हिणी 2 प्रत्येकी, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस) वळवण, भिवपुरी, कोयना (नवजा), खांड 1 प्रत्येकी.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: तुळशी 1.

पुढील हवामानाचा अंदाज:

28 ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

29 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

30 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

31 ऑगस्ट: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

28 ऑगस्ट: विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

29 ऑगस्ट: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.