Maval : मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व कायझेन मिडीया यांच्या संयुक्त विद्यमाने धुंदूर मास महोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – धुंदूर मासचे औचित्य साधून मावळा (Maval) युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व कायझेन मिडीया यांच्या संयुक्त विद्यमाने 6 व 7 जानेवारी रोजी धुंदूर मास महोत्सव साजरा करण्यात आला. 

दर वर्षी सुर्य जेंव्हा धनु राशीत येतो तेंव्हा धुंदूर मास येतो अर्थातच त्यानिमित्ताने धुंदूर मास महोत्सव साजरे होतात. असाच एक धुंदूर मास महोत्सव आनंद साधक संगम या कल्पनेने मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व कायझेन मिडीया यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र चिपळूणकर तर कायझेन मिडीयाच्या अध्यक्ष शिल्पा देशपांडे व मावळाचे अध्यक्ष हनमंत कदम व मार्गदर्शक डॉ महेंद्र ठाकूरदास हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कविसंमेलन झाले. भाग्यश्री दायमा, प्राजक्ता पटवर्धन, कविता क्षीरसागर, वैशाली मोहिते, वैजयंती आपटे, चंचल काळे, उर्मिला वाणी, सुषमा हिरेकेरुर, प्रणव तडवळकर, मकरंद घाणेकर व महेश सिंहासने यांनी कविता सादर केल्या तर पुर्वा काळे यांनी निवेदन केले. सकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमच्या सत्रात मराठी भक्तीगीते सादर करण्यात आली, प्रणव तडवळकर, शंकर गुट्टे, जयश्री साळुंखे व नरसींग देसाई यानी सादरीकरण केले.

Khadki : खडकी रेल्वे स्टेशन येथे महापालिकेमची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

कवितेच्या दुसऱ्या सत्रात गजल मुशायऱ्या मध्ये प्राजक्ता पटवर्धन, चंचल काळे, मकरंद घाणेकर, वैजयंती आपटे, वैशाली मोहीते, कविता क्षीरसागर व उर्मिला वाणी यांनी गजल सादर केल्या तर उर्मिला वाणी याचे अभ्यासपुर्ण निवेदनाने गजल (Maval) प्रकार समजण्यास मदत झाली.

तर तिसऱ्या सत्रात जेष्ठ गझल गायक नरसिंग देसाई यांनी रंजीशे सही, चुपके चुपके, तुम इतना जो अशा लोकप्रीय गजल गायनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.तर चौथ्या सत्रात प्रणव तडवळकर यानी आपल्या मधूर आवाजाने मंत्रमुग्ध केले.जुन्या मराठी हिंदी गीतांचा खजाना उलगडून दाखवला. तसेच जयश्री साळूंखे व प्राजक्ता पटवर्धन यांनी देखील गीत गावून सहभाग नोंदवला.

महेंद्र ठाकूरदास यांनी सर्वांचे स्वागत तर विनायक माने यांनी प्रास्ताविक सादर केले. मनोगत व्यक्त करताना शिल्पा देशपांडे यांनी कायझेन मिडीयाची पृष्ठभूमि व कार्य याची माहिती दिली. तर अध्यक्षीय भाषण करताना नरेंद्र चिपळूणकर यांनी कलेतून आनंद कसा मिळतो व त्यासाठी असे कार्यक्रम किती महत्वाचे आहेत हे विषद केले. नितीन क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.

रात्री भोजनानंतरच्या कॅम्प फायर मध्ये प्रत्येकाची ओळख, शेकोटीची गीते सादर केली गेली. या सर्व सत्राचे संचलन शिल्पा देशपांडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश डोंगरे, उज्वला कोंडे, गोपाळ चिटणीस व पुर्वा काळे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.