Maval : आंदर मावळ व नाणे मावळला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी मंजूर

मावळ – आंदर मावळ व नाणे मावळला जोडणाऱ्या नाणे ते घोणशेत (Maval) दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. हा रस्ता मावळातील दोन भागांना जोडणारा मुख्य रस्ता असून त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार सुनिल शेळके यांनी यासाठी प्रयत्न केले. या रस्त्याचे भूमिपूजन बुधवारी (दि.19) संपन्न झाले.

या भुमिपूजन समारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे,माजी उपसभापती गजानन शिंदे,माजी सरपंच सागर येवले, सरचिटणीस सचिन आंद्रे, दत्ता वाल्हेकर,दत्ता किंजल,सोमनाथ आंद्रे,अमोल वंजारी, रघुनाथ आंद्रे,

सुधीर आंद्रे,सिकंदर मुलाणी,शंकर पिंगळे,ग्रामपंचायत सदस्य नितीन पिंगळे,विशाल पिंगळे,सोमनाथ पिंगळे,भाऊसाहेब दाभणे,अमोल कोंडे,नितीन शेलार, शेखर कटके, सोमा आंद्रे आदि.उपस्थित होते.

Talegaon Dabhade : संत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नाणे ते घोणशेत दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती.विद्यार्थी, दुध व्यावसायिक,शेतकरी यांना या खराब रस्त्यावरुन रोजच प्रवास करावा लागतो.त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती.याची दखल घेऊन आमदार सुनिल शेळके यांनी निधी उपलब्ध केला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्याचे काम होणार असून सात कोटी निधी उपलब्ध झाल्यामुळे सद्यस्थितीत तीन मीटर असणारा रस्ता साडेपाच मीटर होणार आहे.काही ठिकाणी डांबरी व आवश्यक त्या ठिकाणी काँक्रिटी करण करण्यात येणार आहे.

या रस्त्यामुळे नाणे,नवीन उकसान, नाणोली,पारवडी,साई,वाऊंड, कचरेवाडी,घोणशेत येथील ग्रामस्थांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा (Maval) व्यक्त करुन ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.