Talegaon Dabhade : संत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – संत गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त (Talegaon Dabhade) विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील कुंभार आळीतील श्री संत गोरोबाकाका मंदिरात आणि शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात पूजा, विधी आणि कार्यक्रम पार पडले.
तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती,अभिषेक,पुजा,भजन तसेच  श्री संत गोरोबाकाका कुंभार यांच्या  प्रतिमचे पुजन पुणे जिल्हा कुंभार  समाजाचे जिल्हाध्यक्ष व उद्योजक  संतोष  कुंभार आणी मावळ तालुका  पंचायत समितीच्या माजी सभापती  सुवर्णाताई  कुंभार यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी आदर्श शिक्षक पांडुरंग  कार्लेकर गुरूजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, यतिनभाई शहा, पुरोहित अतुलकाका देशपांडे, किरण गवारे, किशोर दरेकर आदी उपस्थित होते. यावेळी आरती व प्रसाद वाटप करण्यात आले.

कुंभार आळीतील श्री संत गोरोबाकाका मंदिरात पहाटे काकड आरती,अभिषेक, पुजा,भजन, जागर  तसेच पालखीची मिरवणूक सायंकाळी ह.भ.प.एकनाथ  महाराज  लिंबोरे यांचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी श्री भैरवनाथ महाराज भजनी मंडळाचे भजन जागर  झाला. शेवटी महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मंडळाचे अध्यक्ष शेखर पाटसकर,  उपाध्यक्ष किशोर दरेकर,सचिव गणेश दरेकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी  कार्यकर्ते यांनी परिश्रम (Talegaon Dabhade) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.