Vadgaon Maval : कान्हे विविध विकास सोसायटीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी पीडीसी बॅंक भरीव अर्थसहाय्य करेल – माऊली दाभाडे

एमपीसी न्यूज – कान्हे विविध विकास सोसायटीच्या प्रशासकीय  इमारतीच्या (Vadgaon Maval) बांधकामासाठी कान्हे ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी केली आहे. जागा मिळताच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसी) बँकेकडून भरीव अर्थसहाय्य केले जाईल, अशी ग्वाही बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली. कान्हे विविध विकास सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या खरीप भातपिक कर्जवाटप कार्यक्रमात माऊली दाभाडे हे बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय  शिंदे,बंडुभाऊ सातकर,दशरथ सातकर,एकनाथ येवले, विलास  जांभुळकर,सुदाम आगळमे,अशोक  सातकर,नंदाताई सातकर,संस्थेचे सचिव गणपत भानुसघरे,बॅंक विकास  अधिकारी सुभाष टेमगिरे व सोसायटीचे शेतकरी सभासद उपस्थित होते.

Khopoli Accident News : रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केले बोरघाट अपघातातील रेस्क्यू टीमचे कौतुक

कान्हे विविध विकास सोसायटीमध्ये, कान्हे,साते,जांभुळ,ब्राह्मणवाडी महत्वाची गावे आहेत.या गांवामधील शेतकरी सभासद असुन या सभासदांना भात पिककर्ज  वाटप करण्यात आले.

कान्हे विविध विकास सोसायटीने  कान्हे  ग्रामपंचायतीकडे  प्रशासकीय  इमारत बांधकामासाठी जागेची मागणी केली आहे. जागा मिळताच बॅंक बांधकामासाठी लागणारे आवश्यक तेवढे कर्ज उपलब्ध करून  देऊ असे श्री दाभाडे यांनी यावेळी  सांगितले.
संस्थेचे  संचालक  बंडुभाऊ सातकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले  तर सचिव गणपत (Vadgaon Maval)  भानुसघरे  यांनी  आभार  मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.