Maval : चुलत्याच्या घरी झोपायला जाणे पडले महागात, घरी झाली 1 लखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – चुलत्याच्या घरी रात्री झोपायला जाणे (Maval) एकाला चांगलेच महागात पडले असून तब्बल 1 लाख 18 हजार रुपयांची घरफोडी झाली आहे. हा प्रकार मावळातील आढले गाव येथे 26 ते 27 फेब्रुवारी दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी मयूर मनोहर भोईर (वय 24, रा. आढले) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चुलत भाऊ त्याची पत्नी व मुलीला सासरवडीला सोडून त्यांचे चुलते यांच्या घरी झोपायला गेले. यावेळी फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ यांच्या घराचे कुलूप (Maval) तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत 47 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 5 हजार रुपयांचे चांदीचे दागिने, 65 हजार रुपये रोख, घड्याळ असा एकूण 1 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावरून शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pimpri News : जॅकवेल डीपीआरच्या तांत्रिक मान्यतेसाठी 1 कोटी 29 लाखांचा खर्च

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.