Maval : प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मनोज भांगरे

एमपीसी न्यूज – मावळ (Maval) तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच वडगाव येथील मावळ तालुका शिक्षक पतसंस्था कार्यालयात पार पडले. संघाचे मावळते अध्यक्ष गेणू मोरमारे अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाची आगामी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मनोज भांगरे, तर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी संगीता शिरसाट यांची निवड करण्यात आली.
विषय नियामक सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण मंडळाचे सरचिटणीस राजेश राऊत हे होते. अधिवेशनामध्ये मावळत्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे सन्मान करण्यात आले. सभेसाठी राज्य संघाचे प्रसिद्धी प्रमुख सुहास विटे, राज्य उपाध्यक्ष संजय जगताप, राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख नेते राजू भेगडे, माजी चेअरमन मुकुंद तनपुरे, नेते शिवाजी ठाकर, माजी अध्यक्ष संतोष गायकवाड, महिला आघाडी माजी अध्यक्षा पुष्पा घोडके, माजी चेअरमन अमोल चव्हाण, ज्ञानेश्वर शिवणेकर, हरिभाऊ आडकर, सुभाष भानुसघरे, अजित मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन नितीन वाघमारे यांनी केले व आभार नवनाथ दिवटे यांनी मानले.
तालुका कार्यकारिणी (Maval)
अध्यक्ष – मनोज भांगरे
सरचिटणीस – धिरजकुमार जानराव
कोषाध्यक्ष – किरणकुमार काटकर
संपर्कप्रमुख – संदीप आडकर
कार्यालयीन चिटणीस – योगेश ठोसर
प्रसिद्धी प्रमुख – बसवराज निंबाळकर
मुख्य संघटक – संतोष शिंदे
महिला आघाडी –
नेत्या – मनिषा संदीप गाडे
अध्यक्षा – संगिता शिरसाट
कार्याध्यक्षा – वनिता पोंक्षे
सरचिटणीस – वैशाली जुन्नरकर
कोषाध्यक्षा – शुभदा वैद्य
याप्रसंगी शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आमची शिक्षक संघटना तितकीच कटीबद्ध असणार आहे आणि प्रशासनास संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज भांगरे व संगीता शिरसाट या दोघांनीही सांगितले. तसेच, शिक्षक नेते संभाजी तात्या थोरात व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संघटना चालवणार असल्याचेही भांगरे व शिरसाट यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.