Eid-e-Milad : पुण्यात ईद-ए-मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज –  हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (Eid-e-Milad) निमित्त उद्या (रविवारी) नाना पेठ ते शुक्रवार पेठ या मार्गावर निघणाऱ्या मिरवणुकीच्या वेळी पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे.

ईद-ए-मिलाद व कोजागिरी पौर्णिमा हा एकाच दिवशी साजरी होणार आहे. हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने पुणे शहरामध्ये मिरवणुका काढण्यात येत असतात. मनुशाह मशिद, नाना पेठ पुणे या ठिकाणावरुन मुख्य मिरवणुकीचा सुरुवात होत असते. या मिरवणुकीमध्ये ट्रक, जीप, रिक्षा वाहनांचा मोठया प्रमाणात समावेश होत असतो. त्यामुळे वाहतूक सुव्यवस्था तसेच सुरक्षितता याचा विचार करून वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे.

Maval : प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मनोज भांगरे

मिरवणूक मार्ग पुढीलप्रमाणे – Eid-e-Milad

मनुशाह मशिद, 482 नाना पेठ पुणे येथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात होते व मिरवणुक संत कबीर चौक, ए.डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पो. चौकी चौक, निशाद सिनेमा, भवानदास चाळ, चुडामण तालीम, मुक्तीकोज चौक, डावीकडे वळून गावकसाब मशिदीचे मागून बाबाजान दर्गा चौक, चारबावडी पो. चौकीचे पाठीमागून शिवाजी मार्केट ते सेंटर स्ट्रीट रोडने उजवीकडे वळून भोपळे चौक, गायक साब मशिदी समोरील मुक्तिफौज चौक ते पुलगेट चौक, डावीकडे वळून एम. जी. रोडने कोहिनूर चौक, महावीर चौक, डावीकडे वळून साचापीर स्ट्रीटने महात्मा फुले चौक, संत कबीर चौक, नाना चौक, अल्पना सिनेमा ते हमजेखान चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून सुमान शहा दर्गा चौक, सिटीजामा मशिद शुक्रवार पेठ, पुणे येथे सांगता होते.

Rajesh Pille : पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक राजेश पिल्लेंवर 15 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

या भागातील मिरवणूक पुढे जाईल. तसे वाहतूकीची परिस्थितीनुसार व आवश्यकतेनुसार तेथील वाहतुक बंद केली जाईल अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल. तसेच, या मार्गावर केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यांना परवानगी असणार आहे. तरी वाहन चालकांनी पोलीसांना सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन पुणे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीराम यांनी नागरिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.