Pimpri : ईद-ए-मिलाद निमित्त शहरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त पिंपरी (Pimpri) येथे मिरवणूक आणि सभेचा कार्यक्रम होणार आहे. तसेच शहरात ठिक ठिकाणी  ईद-ए-मिलाद साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात बंदोबस्त ठेवला आहे.

मिलिंदनगर पिंपरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी यादरम्यान शनिवारी (दि. 30) मिरवणूक काढली जाणार आहे. चिखली, नेहरूनगर, वाकड, काळेवाडी, भोसरी, निगडी, कासारवाडी येथील 20 मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणूक झाल्यानंतर पिंपरी येथील आंबेडकर चौकाजवळ असलेल्या मैदानात सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे सात ते आठ हजार नागरिक येणार असल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पिंपरी येथील वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल शनिवारी दुपारी दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहेत. तसेच शहरात ठीक ठिकाणी ईद-ए-मिलाद निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

Pune : पुण्यात गणेशोत्सवात आगीच्या 27 घटना, सुदैवाने जीवित हानी नाही

शहरातील पोलीस बंदोबस्त – Pimpri

अपर पोलीस आयुक्त – 01
पोलीस उपायुक्त – 05
सहायक पोलीस आयुक्त – 07
पोलीस निरीक्षक – 55
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – 164
अंमलदार – 1779
होमगार्ड – 239
वॉर्डन – 168
एसआरपीएफ – 1 कंपनी (100 जवान)
आरसीपी – 04
स्ट्राईकिंग – 15
बीडीडीएस पथक – 01

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.