Pune : पुण्यात गणेशोत्सवात आगीच्या 27 घटना, सुदैवाने जीवित हानी नाही

एमपीसी न्यूज – गणरायाच्या धामधुमीत पुणे (Pune) शहरात छोट्या मोठ्या अशा एकूण 27 आगीच्या घटना घडल्या. पण सुदैवाने यात कोणीही जखमी किंवा जीवित हानी झालेली नाही.

Pimpri : ईद-ए-मिलाद निमित्त पिंपरीतील वाहतुकीत बदल

शहर परिसरात साने गुरूजी नगर येथे गणपती मंडळ सजावट मंदिराच्या कळसाला लागलेल्या आगीव्यतिरिक्त कुठेही मंडपास आगीचा प्रकार नाही. तसेच गेल्या 10 दिवसात अग्निशमन दलाकडे विविध प्रकारच्या आग वर्दि एकुण 27 होत्या.

उत्सवासाठी अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे आणि जवळपास 20 अग्निशमन अधिकारी व 200 जवान 5 अग्निशमन वाहने विशिष्ट ठिकाणी तसेच लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रश्शी अशा विविध साहित्यासह अग्निशमन दल बंदोबस्तावर तैनात झाले होते.

यावेळी पुणे महानगरपालिका हद्दीमधे सुदैवाने कोठे ही गणपती विसर्जन दरम्यान कोणी ही पाण्यात बुडाल्याची घटना घडल्याची नोंद दलाच्या नियंत्रण कक्षात नाही. अधिकारी व जवानांच्या सतर्कतेमुळे तसेच दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्तासाठी असलेले अधिकारी व जवान यांचा “गणपती बाप्पा मोरया 2023” हा वॉटसअप गृप दलाचे नियंञण कक्ष व अधिकारी आणि जवान यांच्यासाठी विषेश उपयोगी ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.