Metro News : गणेशोत्सव काळात मेट्रो धावणार मध्यरात्री पर्यंत!

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव (Metro News) काळात पुणे शहरात लाखो भाविक येत असतात. त्यांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने देखील आपली सेवा मध्यरात्री पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सहा दिवस मध्यरात्री बारा तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रो पहाटे दोनपर्यंत सुरु राहणार आहे.

पुणे शहरात मानाचे गणपती, त्यासह दगडूशेठ आणि अन्य मंडळांच्या गणेशोत्सवात नागरिकांची मोठी गर्दी असते. दहा दिवस भाविकांचा शहरात राबता असतो. इथले देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे राज्यभरातून भाविक पुणे शहरात गणेशोत्सवासाठी येतात. या भाविकांची सोय होण्यासाठी पीएमपीएमएलने 24 तास सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मेट्रोने देखील आपल्या सेवेच्या वेळेत वाढ केली आहे.

Ravet : विद्यांगण हायस्कूलमध्ये रंगला आजी- आजोबा आनंद मेळावा

मेट्रो सेवा सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत सुरु आहे. गणेशोत्सव कालावधीत 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या दरम्यान सकाळी सहा (Metro News) ते रात्री बारा पर्यंत मेट्रो सुरु राहील. तर अखेरच्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजेपर्यंत मेट्रो सुरु राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी मेट्रो सेवेचा उपयोग करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.