Ravet : विद्यांगण हायस्कूलमध्ये रंगला आजी- आजोबा आनंद मेळावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील (Ravet) रावेत येथील ओम प्रतिष्ठान संचलित विद्यांगण हायस्कूलमध्ये नुकताच ‘ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा’ घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे तर प्रमुख पाहुणे एमपीसी न्यूजचे मुख्य संपादक विवेक इनामदार तसेच प्रशांत दाणी सर, पुंडलिक गणिगर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रेखा पवार, पंढरीनाथ सानप, विष्णुपंत उल्हाणे, उद्धव देशपांडे, रवींद्र कदम, येवले सर यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी विद्यांगण हायस्कूलच्या प्राचार्या वनिता सावंत यांच्या हस्ते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व आजी-आजोबांचे विद्यांगण हायस्कूलच्या प्रांगणात औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रेमी व समाजसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

BJP : जाहीर झालेल्या भाजप कार्यकारणीवरुन सुंदोपसुंदी?

कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन (Ravet)व संस्थेची ओळख विद्यांगण हायस्कूलच्या प्राचार्या वनिता सावंत यांनी करून दिली. विद्यांगण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसाठी नृत्य, गाणी सादर करून त्यांचे मनोरंजन केले. तसेच ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व आजी आजोबांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदू भावसार व नीलम डफळे यांनी केले. आभारप्रदर्शन अमृता शेरकर यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा उत्कृष्टरित्या पार पाडण्यात सर्व शिक्षिका, सहकारी तसेच नयन फडतरे यांचे विशेष सहकार्य लाभले.अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात मेळावा संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.