Alandi : आळंदीत हरितालिका पूजन उत्साहात

एमपीसी न्यूज : श्रावण महिना संपला (Alandi ) की सगळ्यांना वेध लागतात ते श्री गणरायांच्या आगमनाचे. यंदा 19 सप्टेंबरला गणपती बाप्पा येणार आहेत. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आज 18 तारखेला हरतालिका मातेचे पुजन घरोघरी होत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत.
भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने केलेले हे व्रत होय. हे व्रत केल्याने मनासारखा जोडीदार मिळतो अशी भावना आहे. त्यामुळे पिढ्यांपिढ्या हे व्रत घरोघरी केले जाते. तसेच नदी तीरावर ही भाविक हे पूजन करतात.
BJP : जाहीर झालेल्या भाजप कार्यकारणीवरुन सुंदोपसुंदी?
दरवर्षी गणपती बाप्पाच्या आधी (Alandi) हरतालिका मातेच्या मूर्तींचे आगमन आणि पूजन होते. या दिवशी महिला उपवास (व्रत) करतात. हरतालिका पुजना साठी आवश्यक असलेले साहित्य, वस्तू आणल्या जातात. तद्नंतर पूजा मांडली जाते. व पूजन केले जाते. त्या कथेचे वाचन केले जाते.