Rajesh Pillay : पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक राजेश पिल्लेंवर 15 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले उर्फ राजेश पिल्ले (Rajesh Pillay) यांच्यावर पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.7) 15 कोटींची फसवणूक केल्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संजय दयानंद ओसरमल (वय 39, रा.पिंपरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.7) तक्रार दिली आहे. ही फसवणूक 5 फेब्रुवारी 2019 ते  मे 2022 या कालावधीत झाली आहे.

Online Fraud : ऑनलाईन फसवणूक झालेले सुमारे पावणे तीन लाख पोलिसांनी मिळवले परत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पिल्ले (Rajesh Pillay) यांनी ब्रह्माकॉर्प लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक रामकुमार अग्रवाल यांच्यातर्फे जमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये प्रिसिपल एजंट (विश्वस्त प्रतिनिधी) म्हणून काम करत असून पिल्ले यांनी पुण्यातील चरवली बुद्रुक येथील सर्वे नंबर 210 हिस्सा नंबर 6 मधील एकूण 95 आर ही मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार ब्रह्मदत्त अगरवाल यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे व धनंजय हनमंत लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदीखत करत 15 कोटींना विकली.

Inner Wheel Club : परंदवडी येथील महिलांना मेंस्ट्रुअल कपचे वाटप

त्यामुळे ब्रह्माकॉर्प कंपनीचा विश्वासघात करून 15 कोटी रुपयाचा अपहार करत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीची फसवणूक केली म्हणून पिल्ले यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अद्याप पिल्ले यांना अटक झाली नसून चंदननगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.