Inner Wheel Club : परंदवडी येथील महिलांना मेंस्ट्रुअल कपचे वाटप

एमपीसी न्यूज – इनर व्हील क्लब (Inner Wheel Club) ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या अंतर्गत परंदवडी येथील अंगणवाडी येथे मेंस्ट्रुअल कपचे वाटप करण्यात आले. यावेळी क्लब अध्यक्षा वैशाली दाभाडे, सचिव निशा पवार, आयएसओ अर्चना देशमुख, ग्रामीण भागातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
सॅनिटरी नॅपकिनच्या वापरानंतर त्याचे पर्यावरणात व्यवस्थित विघटन होत नाही व पर्यायाने पर्यावरणाची हानी होते, म्हणून मेंस्ट्रुअल कप हे सॅनिटरी नॅपकिनला उत्तम पर्याय आहे असे अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सांगितले. क्रीडा व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला व विद्यार्थिनींसाठी मेंस्ट्रुअल कप उत्तम पर्याय असल्याचे सांगितले
आज परंदवडी येथील महिला, महाविद्यालयातील विद्यार्थिनी (Inner Wheel Club) व ठाकर वस्ती येथील महिला यांना मेंस्ट्रुअल कपचे वाटप व मेंस्ट्रुअल कपच्या वापराविषयी मार्गदर्शन डॉ. वैष्णवी व राधिका यांनी केले. या वेळी परंदवडी येथील सामाजिक कार्यकर्त्या शीतल जाधव व अंगणवाडी शिक्षिका रंजना ढम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.