Online Fraud : ऑनलाईन फसवणूक झालेले सुमारे पावणे तीन लाख पोलिसांनी मिळवले परत

एमपीसी न्यूज – काही तरी कारण देत हॅकर्स (Online Fraud) तुमच्य़ा कार्डचा ओटीपी मिळवतात व त्या ओटीपीद्वारे तुमच्या खात्यातून एक तर रक्कम मिळवली जाते किंवा खरेदी केली जाते. पुण्यात एका कंपनी मॅनेजरला असाच गंडा घालण्यात आला होता. पुणे सायबर सेलने मात्र स्मार्ट वर्क करून त्यांचे सुमारे पावणे तीन लाख रुपये परत मिळवले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एका कंपनीच्या चीफ मॅनेजरला मुंबईमध्ये हॉटेल बुकिंग करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च करत उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी सायबर गुन्हेगाराने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेऊन, त्यांच्या क्रेडीट कार्डचा ओटीपी घेतला. त्याद्वारे फ्लीपकार्टवरून त्याने 2 लाख 94 हजार 389 रुपयांची खरेदी केली. फिर्यादी यांच्या ती बाब लक्षात येताच त्यांनी त्वरीत पोलीस तक्रार केली. याच तक्रारीचा तपास शिवाजीनगर पोलीस सायबर सेलकडे गेला.

Inner Wheel Club : परंदवडी येथील महिलांना मेंस्ट्रुअल कपचे वाटप

यावेळी सायबर टीमने तात्काळ फ्लिपकार्ट वाल्यांना मेल करून तक्रारदारा (Online Fraud) यांचे क्रडीटकार्डवरून गेलेले 2 लाख 89 हजार 197 रुपये रिफंड मिळवले. त्यामुळे तक्रारदाराचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले. यावेळी सायबर सेल यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अनोळखी किंवा अनधिकृत लिंकवर क्लीक करू नका, त्याची आदी शहानिशा करा. त्यानंतरही काही फसवणूक झालीच तर त्वरीत http:cybercrime.gov.in या पोर्टलवर आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवा.

ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अमंलदार (Online Fraud) गणपत वालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, महिला पोलीस अमंलदार रुचीता जमदाडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.