Maval : रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना ( Maval ) सोमवारी (दि. 5) मध्यरात्री घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री एका रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली नाही. मयत तरुणाचे वय अंदाजे 23 वर्ष आहे.

Maharashtra News : महाराष्ट्रातील नऊ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन

रंग गोरा, केस काळे, नाक बसके, बारीक दाढी, अंगावर पांढरा शर्ट त्यावर काळ्या रंगाची नक्षी असलेला घातला आहे. वरील वर्णनाच्या व्यक्तीविषयी कोणास माहिती असल्यास तळेगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे ( Maval ) आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.