Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आळंदीमध्ये मविआ बैठक संपन्न

एमपीसी न्यूज : काँग्रेस नेते (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ पदयात्रा काढण्यात आली आहे. कन्याकुमारी येथून या पदयात्रेला सुरूवात झाली. ही पदयात्रा एकूण 12 राज्यातून व दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. यामुळे देशभरात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा आहे.

दक्षिणेत भारत जोडो यात्रेला सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सगळ्यांच्याच तोंडी राहुल गांधी यांचे नाव आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आळंदीतील विठ्ठल कृपा मंगल कार्यालयात मविआचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली.

भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुढील (Bharat Jodo Yatra) महिन्यातील रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू स्मारक ते आळंदी येथील महात्मा गांधी स्मृती स्मारक पर्यंत पायी यात्रा काढण्यात येणार आहे. यात कॉंग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मविआचे घटक पक्ष सुद्धा सहभागी होणार आहेत.

आळंदी येथील नियोजन बैठकी वेळी मविआचे नेते बबनराव कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, डी. डी. भोसले, प्रकाश कुऱ्हाडे उत्तमराव गोगावले, आनंदराव मुंगसे, आरिफ शेख, संतोषराजे भोसले, रोहन कुऱ्हाडे, निसार सय्यद, विष्णू वाघमारे, नाजीम शेख, विक्रम गुटे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Diwali Pahat : सोहम योग साधना आणि फोरम फाॅर म्युझिक फाऊंडेशनतर्फे रंगली दिवाळी पहाट मैफल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.