Shikrapur Police : पोलीस हवालदारावर लाच मागणी प्रकरणी कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण येथील शिक्रापूर पोलीस (Shikrapur Police) ठाण्यातील पोलीस हवालदारावर लाच मागणी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याबाबत 43 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती.

अनिरुद्दीन शक्ती उद्दीन चमन शेख (पोलीस हवालदार, शिक्रापूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण) या आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7, ‘अ’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी शेख पोलीस हवालदार याने लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि ) पुणे यांना दिली होती. या तक्रारीची 28 जुलै 2022 रोजी पडताळणी केल्यावर दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी अमिरूद्दीन शेख याने डेप्युटी पॅकेज व मोबाईल अशी मागणी केली होती. त्यावरून लाच मागणीचा गुन्हा 21 ऑक्टोबर रोजी नोंद करण्यात आला आहे.

पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे तपास करत (Shikrapur Police) आहेत. ही कारवाई पोलीस उप आयुक्त, पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.