Punjab : भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन

एमपीसी न्यूज : भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबमधील (Punjab) जालंधर येथील काँग्रेसचे लोकसभा खासदार संतोख सिंह चौधरी यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत पायी प्रवास करत होते. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे भारत जोडो यात्रेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. 

Dehugaon News : ‘पवित्र माती मंगल कलश संवाद’ यात्रेचा श्री क्षेत्र देहूगाव येथून उत्साहात प्रारंभ

संतोख सिंह चौधरी यांचा जन्म 18 जून 1946 रोजी (Punjab) जालंधर जिल्ह्यातील नाकोदर तालुक्यात असलेल्या धालीवाल गावात झाला. ते पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर जिंकली. त्यांचा विजयाचा सिलसिला 2019 मध्येही कायम राहिला आणि त्यांनी जालंधर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र, आज सकाळी त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वयाच्या 76  व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.