Pune : खोदकामांमुळे पुण्यात गॅस पाईपलाईनला आग, दोन दिवसात दुसरी घटना

एमपीसी न्यूज – पुण्याच्या विविध भागात रस्त्यांची खोदकामे (Pune) सुरु आहेत. यामुळे जमिनी अंतर्गत असलेल्या ज्या गॅस पाईप लाईन आहेत; त्यांना आग लागल्याच्या मागील दोन दिवसात दोन दुर्घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, खोदकामावेळी केलेला निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा या घटनांमधून समोर येत आहे.

सिहंगड रस्त्यावर गुरुवारी (दि.13) रात्री राजाराम पुल येथे एमएनजीएल कंपनीची गॅस पाईपलाईनने पेट घेतला होता. येथे ही खोदकामच सुरु होते. त्यानंतर लागलीच शनिवारी (दि.14) पहाटे सव्वा चार वाजता खराडी येथील विठ्ठल बोराटे नगर येथे एमएनजीएल गॅस पाईपलाईनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहराची सुरक्षितता धोक्यात घालून हे खोदकाम सुरु आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शनिवारी पहाटे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात खराडी येथील विठ्ठल बोराटे नगर येथे एमएनजीएल गॅस पाईपलाईनला आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन रवाना करण्यात आले होते.

Punjab : भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन

घटनास्थळी पोहोचताच तिथे रस्त्यावर एमएनजीएल (Pune) या कंपनीची पाईपलाईनने व तिथेच जवळपास असणारी एक हातगाडी पेटल्याचे जवानांनी पाहिले असता तातडीने पाण्याचा सतत मारा सुरू ठेवून आग विझवली. तसेच सदर ठिकाणी एमएनजीएलचे कर्मचारी यांनी धाव घेत तेथील इतर लाईन बंद केली होती. ज्या ठिकाणी आग लागली तेथे खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले असून या घटनेत कोणीही जखमी नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे.

या कामगिरीत येरवडा अग्निशमन केंद्र येथील चालक रघुनाथ भोईर व जवान उमाकांत डगळे, विलिन रावतु, नवनाथ वायकर, अमित वाघ यांनी सहभाग घेतला.

पुणे शहराच्या जमिनीतून अशा अनेक गॅस पाईपलाईन व विद्युत वाहिन्या गेलेल्या आहेत. खोदकाम करताना योग्य ती काळजी घेतली नाही, तर मोठ्या दुर्घटनेला शहराला सामोरे जावे लागेल अशी भिती या दोन घटनांनंतर व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.