Pune : पुणे विद्यापीठ G-20 परिषदेसाठी सज्ज, हेरिटेज वॉकचा आनंद घेण्यासाठी परदेशी पाहुणे

एमपीसी न्यूज : पुण्याचे (Pune) वैभव समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (SPPU) ऐतिहासिक वास्तू 20 देशांतील पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. ‘हेरिटेज वॉक’च्या निमित्ताने पर्यटकांना येथील 150 वर्षे जुन्या ऐतिहासिक वास्तू, विविध संग्रहालये, भुयारी मार्ग आणि जैवविविधता अनुभवता येणार आहे.

G20 परिषदेच्या निमित्ताने पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत फलक, रंग आणि तंबू लावण्यात आले असून, विद्यापीठाच्या वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे.

या अभ्यागतांना संपूर्ण परिसराची माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठाने खास हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2018 पासून बाहेरील लोकांसाठी ‘हेरिटेज वॉक’ सुरू केला आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठाबाहेरील नागरिकांना दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी विद्यापीठात येऊन या रचनेची माहिती घेता येईल.

Punjab : भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन

मुख्य इमारतीतील (Pune) भुयारी मार्ग, इतिहास संग्रहालय, व्यंगचित्र संग्रहालय, इतिहास आणि मानववंशशास्त्र विभागाचे संग्रहालय आणि इतर मुख्य आकर्षणे आहेत. परदेशी पाहुण्यांनाही या सर्व गोष्टींची माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठाने या हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे.

इतिहास विभागप्रमुख व हेरिटेज वॉक समितीच्या सदस्या डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी इतिहास विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी याविषयी पाहुण्यांना माहिती देणार असल्याची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.