Laxman Jagtap : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर साडेपाच वाजता होणार अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे आज (मंगळवारी) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी ठेवण्यात आले असून जगताप यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयालगतच्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

Mahavitaran Strike : आज मध्यरात्रीपासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी जाणार संपावर

आमदार जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी (Laxman Jagtap) पिंपळेगुरव येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. जगताप यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयालगतच्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

t

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.