Rupee Bank : ठेवीदारांच्या रकमा देण्यासंदर्भात कोणते प्रयत्न केले? प्रतिज्ञापत्र सादर करा, ‘रुपी’च्या लिक्वीडेटरांना न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील (Rupee Bank) रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेत अडकलेले ठेवीदारांच्या रकमा देण्यासंदर्भात कोणते प्रयत्न केले. पुढील वसुली कशा पद्धतीने होणार आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रुपी बँकेच्या लिक्वीडेटरांना दिले आहेत. तसेच विमा कंपनीलाही प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणने मांडण्यास सांगण्यात आले.

गेली आठ वर्षे रुपी बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली. रुपी बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली असून बँक चालू होऊ शकते. बँक चालू करण्याची परवानगी देण्यासाठी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बँकेचे लिक्वीडेटर यांच्यासह सात जणांना प्रतिवादी केले आहे. याचिकेवर नुकतीच न्यायमुर्ती एम.एम.साठे आणि आर.डी.धनुका यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ठेवीदारांना रक्कम देणे आणि कर्ज वसुलीसंदर्भात कोणते प्रयत्न केले. याबाबत दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Laxman Jagtap : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर साडेपाच वाजता होणार अंत्यसंस्कार

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात (Rupee Bank) रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे हजारो खातेदार व ठेवीदार आहेत. त्या माध्यमातून सुमारे 1 हजार 297 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत. सुमारे आठ वर्षांपूर्वी विविध कारणांमुळे रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे खातेदार, ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे प्रयत्न सुरु असून केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांपासून ते न्यायालयीन लढाई ते लढत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.