Moshi Crime News : धक्कादायक ! ‘मुलीने आत्महत्या करावी अन्यथा ठार मारू’ ; मुलीचे पालक व मुख्याध्यापकांना धमकीचे मेल

एमपीसी न्यूज – शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीने आत्महत्या करावी अन्यथा तिला जीवे मारू, अशा प्रकारची धमकी देणारे मेल मुलीचे पालक आणि मुख्याध्यापक यांच्या मेलवर पाठवण्यात आले आहेत. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबात मोशी येथील एका 42 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 507, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67, 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 15 जून ते 12 डिसेंबर 2020 या कालावधीत मोशी येथे घडला आहे. फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीच्या झूम अ‍ॅपवर, तिच्या वडिलांच्या ईमेलवर आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ईमेलवर अश्लील मेसेज पाठवून अज्ञाताने मुलीचा विनयभंग केला.

अल्पवयीन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार शहरात घडला असून यामुळे पालक वर्गासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.