Moshi : ऑफिसचे लॉक तोडून पाणे दोन लाखांचे साहित्य गेले चोरीला

एमपीसी न्यूज – जमुना ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन यांच्या मोशी येथील यार्ड (Moshi)ऑफीसमध्ये 5 ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चोरांनी लॉक तोडून ऑफीसमध्ये प्रवेश केला. तेथील अपोलो कंपनीच्या ट्रेलरची 9 चाके, 6 बॅटरी असा एकूण 1 लाख 84 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात(Moshi) राकेश पद्माकर नागरकर (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : दुकानदार महिलेकडे बिस्कीट घेण्याचा बहाणा करून मंगळसुत्र हिसकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जमुना ट्रान्सपोर्ट येथे चोरांनी सुरुवातीला ऑफिसचे लॉक तोडले. ऑफिसमध्ये प्रवेश करून 1 लाख 62 हजार रुपयांचे 9 टायर , 22 हजार रुपयांच्या 6 बॅटरी असा एकूण 1 लाख 84 हजार रुपयाचे साहित्य चोरानी चोरून नेले आहे. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.