Talegaon Dabhade : दुकानदार महिलेकडे बिस्कीट घेण्याचा बहाणा करून मंगळसुत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुकानदार महिलेकडे पत्ता विचारत विचारत बिस्कीटचा पुडा (Talegaon Dabhade) मागितला. तो पुडा पिशवीत टाकण्यास सांगितले. पुडा पिशवीत टाकत असताना महिला वाकली असता तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून चोरटे पसार झाले. हा प्रकार शुकवारी (दि.10) तळेगाव दाभाडे जवळील शंकरवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस(Talegaon Dabhade) ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सच्या आजीव सदस्यपदी सुषमा चोरडिया व सिद्धांत चोरडिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चहाची टपरी आहे. त्या टपरीवर काम करत असताना आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीला मारुती मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारला. यावेळी फिर्यादी यांनी पत्ता सांगितला असता आरोपींनी त्यांना बिस्कीटचा पुडा मागितला.

 

तो पुडा पिशवीत टाका सांगितल्याने फिर्यादी या वाकून पिशवीत पुडा टाकत असताना आरोपींनी वाकलेल्या फिर्यादी यांच्या गळ्यातील 70 हजार रुपयांचे गंठन हिसकावून नेले. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.