Diwali Pahat : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात रसिक झाले स्वरांत चिंब

एमपीसी न्यूज – महात्मा फुले नगर गौतम बुद्ध उद्यानातील(Diwali Pahat) ओम- शांतीगंगा ज्येष्ठ नागरीक संघाच्या विरूंगळा केंद्रात धनत्रयोदशीच्या पहाटे सहा वाजता संगीत दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून झाले.

प्रतिष्ठाण चे शिवानंद चौगुले , यशवंत कन्हेरे शेखर कोकणे , अनिल काशीद आदी उपस्थित होते.ताल निनाद संगीत विद्यालयाचे बालकलाकार स्वरा अंधारे अनन्या शेटे . अनुष्का साखरकर .स्रुष्टी वेळापुरे त्रिष्णा लष्करे यांनी शारदास्तवनाचे झाली.

 

“तुझे रूप चित्ती राहो” “नमिला गणपती” “केशवा मधला” “रामारघुनंदना ” “खेळमांडियेला वाळवंटी ठाई” “देहाची तिजोरी” विठु (Diwali Pahat) माऊली तु माऊली जगाची” अशी अनेक रचना रेखा बाकले अनीता खोल्लम्, वर्षा सदार, यशोदा सावंत यानी सादर केल्या.”मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव” “ऊठ पंढरीच्या राजा” “देहाची तिजोरी ” “देहाची तिजोरी” “विठ्ठलाच्या पायी वीट” “अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान” आदि भक्ती रचना योगेश धुरी श्रीराम देशपांडे आणि अक्षय ऊरूणकर या गायकांनी सादर केल्या.

Pimpri : ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी शॉर्ट व्हिडीओ/रील स्पर्धा, ‘इतकी’ आहेत बक्षीसे

वय वर्ष पाच असलेल्या समर्थ शिंदे या बालकांने युगत मांडली हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत सादर करून सर्व रसिकांना ताल धरायला भाग पाडले.

सामुहिक तबला वादनात वरदा कोकणे दुर्वा कोकणे जान्हवी श्लोक कावडे विहान अहिरराव शिवम् खत्री कैवल्य मानकर देशपांडे भक्ती मोरे कार्तिकी सावंत अर्चिता शिंगाडे निनाद शिंगाडे विशाल खवरे शर्व चाफळकर शौर्य शिंदे, सिधेय शिंदे ,पार्थ कदम ,अथर्व पाटील, शुभम पाटोळे,राहुल केंद्रे ,ऋषिकेश गाडेकर, श्रीकांत खलाटे, प्रणव वाडकर, यशवंत कराड या कलाकारांनी. ताल झपताल ,त्रिताल ,एकताला तिस्त्र जाती कायदे चतस्त्र जाती कायदे रेले तुकडे चक्रधार गतीने वादन केले. आजोजीत दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून सुरांची व तालांची मेजवानी उपस्थित रसिकांना मिळाली.विद्यालयाचे संचालक सचिन शिंगाडे व म्रुणाल शिंगाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांथ संगत केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ व श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंच यांचे सहकार्य लाभले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.