Chinchwad : जमीन खरेदीच्या व्यवहारात व्यावसायिकाची सव्वा कोटीची फसवणूक

एमपीसी न्यूज – कमी किंमतीत प्लॉट मिळवून देतो म्हणून व्यावसायीकाची(Chinchwad) तब्बल सव्वा कोटींची फसवणूक केली आहे. हा फसवणूकीचा प्रकार 17 जुलै 2019 रोजी संभाजीनगर चिंचवड येथे घडली आहे.

याप्रकरणी गिरीश नवनाथ आव्हाड (वय 47 रा. औंध) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून विशाल चुगेरा रा.वानवडी,शिवम बनवारीदास महंत रा.वडगाव शेरी, मनोज सरसनाथ राय रा.पिंपरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सच्या आजीव सदस्यपदी सुषमा चोरडिया व सिद्धांत चोरडिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जमीन खरेदी (Chinchwad)विक्रीचा व्यवसाय आहे. यावेळी कमी किंमतीत 20 हजार 500 चौरस मीटरचा प्लॉट कमी किंमतीत मिळवून देतो असे आमिष दाखवले.

यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 1 कोटी 29 लाख 50 हजार रुपये घेतले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून कच्चा करारनामा करून घेतला. मात्र आज अखेर पर्यंत कोणतीही जागा न देता व पेशांची परतफेड करत फिर्यादीचा फसवणूक केली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.