Supriya sule : खासदार सुप्रिया सुळे थेट रस्त्यावर, वाहतूक सुरळीत करण्याचा केला प्रयत्न

एमपीसी न्यूज : पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. याचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला. (Supriya sule) जवळपास अर्धा तास सुप्रिया सुळे यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला.त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.

Pune sucide : पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

वाहतूक कोंडी का होतेय या संदर्भात नागरिकांशी चर्चा केली.यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक भूमिकेत दिसल्या.खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. (Supriya sule) वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केलं आहे.हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.