Mumbai: राज्यात नवे 118 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 3320, मृतांचा आकडा 201 वर

आणखी 31 रुग्ण कोरोनामुक्त, एकूण 331 रुग्ण बरे होऊन घरी रवाना

एमपीसी न्यूज – राज्यात आज (शुक्रवारी) 118 नवीन रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत राज्यात नोंद झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 320 आहे. राज्यात आज सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 201 वर पोहचली आहे. आणखी 31 जण रुग्णालयातून घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 331 झाली आहे.

राज्यात आज सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे पाच तर पुण्यातील दोन आहेत. मृतांपैकी पाच पुरुष तर दोन महिला आहेत. सात मृतांपैकी एक जण 60 वर्षे किंवा त्यावरील आहेत तर सहा रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या सातजणांपैकी पाच रुग्णांमध्ये ( 71 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 201 झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61,740 नमुन्यांपैकी 56,964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटीव्ह आले आहेत तर 3320 जण पॉझिटीव्ह आले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर करटेनरमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 330 कटेनर्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5,850 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 20 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

काल परभणी महानगरपालिकेत पहिला कोविड-19 बाधित रुग्ण आढळल्यानंतर या 21 वर्षीय रुग्णाच्या सहवासितांचा युध्दपातळीवर शोध घेण्यात येत असून आतापर्यंत नऊ अतिजोखमीच्या रुग्णांना शोधून जिल्हा रुग्णालय परभणी येथे भरती करण्यात आले आहे तर या रुग्णाच्या भोसरी पुणे येथील चार सहवासितांनाही शोधण्यात आले असून त्यांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.

सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6 हजार 376 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.