Pimpri: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बसविणार म्युरल्स

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्रेक्षागृहातील अंतर्गत भिंतीवर नाटक, लोककला, गायन इत्यादी क्षेत्रातील चित्रे लावून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. भिंतीवर ग्राफिकल पेटींग म्युरल्स बसविण्यात येणार असून त्यासाठी येणा-या सात लाख 74 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती साप्ताहिक सभा आज (सोमवारी) पार पडली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व वाहतूक करण्यासाठी येणा-या 31 लाख रुपये, प्रभाग क्रमांक आठ मधील सेक्टर क्रमांक 11 आणि 13 येथील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या 31 लाख 70 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रभाग क्रमांक चार दिघी-बोपखेल येथील विविध ठिकाणची चरांची व डांबरी रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी 31 लाख 82 हजार रुपये खर्च येणार आहे. प्रभाग क्रमांक आठ मधील भाजी मंडईचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच इतर कामे करण्यासाठी येणा-या 62 लाख 79 हजार रुपयांच्या खर्चास स्थायीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

आनंदनगर परिसरातील जलनि:सारण नलिका टाकणे तसेच इतर कामे करण्यासाठी 36 लाख 94 हजार, पुनावळे ताथवडे परिसरात जलनि:सारण नलिकांची कामे करण्यासाठी येणा-या 30 लाख 34 हडार, सिद्धार्थनगर, गुलाबनगर, जयभीमनगर, महात्मा फुले झोपडपट्टी परिसरात जलनि:सारणची कामे करण्यासाठी येणा-या 23 लाख 68 हजार अशा एकूण 13 कोटी 75 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.