Chinchwad News : चिंचवड येथे रंगला बहारदार गीतांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज :  ‘ जय जय हे ओंकारा , ‘ ‘ दीनानाथा दयासागरा,’  ‘ सत्यम- शिवम सुंदरा, ‘ अशा एकाहून एक सरस गीतांनी सोमवारी (ता. 12) सौ. उत्तरा केळकर आणि त्यांच्या (Chinchwad News) सहकलाकारांनी चिंचवड येथे सादर केलेला सुगम संगीताचा कार्यक्रम रसिकांना एक संस्मरणीय आनंद देणारा ठरला. उत्तरोत्तर सादर केलेल्या विविध बहारदार गीतांनी कार्यक्रमाची रंगत शेवटपर्यंत वाढवत नेली.

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरालगतच्या देऊळमळाच्या पटांगणावर 461 वा संजीवन समाधी महोत्सव सुरु आहे. त्याअंतर्गत सोमवारी  (ता. 12) रात्री हा कार्यक्रम झाला. दुपारीच जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पटांगणाचा परिसर ओला होता. तरीही शेवटपर्यंत थांबून रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. व्हीआयपी पाहुण्यांसाठी आणि कलाकारांसाठीच्या आरामदायी खुर्च्या, सोफाही भिजले होते.

कार्यक्रमाची सुरवात श्री उत्तरा केळकर  यांनी ‘ स्वस्ति श्री गणनायको गजमुख ‘, या श्लोकाने केली. त्यानंतर त्यांनी  ‘ जय जय हे ओंकारा , ‘ ‘ दीनानाथा दयासागरा,’  ‘ सत्यम- शिवम सुंदरा, ‘ ‘ माझी रेणुका माउली ‘, अशी परमेश्वराच्या विविध रूपांची आळवणी करणारी गीते गायली. त्यानंतर अनेक रसिकांनी केलेल्या फर्माइशीनुसार प्रसिद्ध असे ‘ एक चीक मोत्याची माळ ‘, हे गीत सादर केले.(Chinchwad News) त्याला रसिकांनी खूपच चांगली दाद दिली. त्यानंतर हेमंत वाटवेकर यांनी ‘ डौल मोराच्या मानचा ‘,  गुरु ठाकूर यांचे ‘ मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते’, ही सदाबहार गीते त्यांच्या सुरेल आवाजात सादर केली. टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी त्याला दाद दिली. त्यानंतर केळकर यांनी ‘ अशी हि बनवाबनवी चित्रपटातील ‘ कुणी तरी येणार येणार ग ‘, हे गाणे सादर केले. यानंतर ‘ चला जेजुरीला जाऊ ‘, हि लावणी केळकर यांनी सादर केली.  केळकर यांच्याच ‘ जोगवा मागते ‘, या गीताने कारकयाक्रमाची सांगता झाली.

 

श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या 461 व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. उत्तरा केळकर आणि सहकलाकारांचा सोमवारी (ता. 12) सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम झाला. यावेळी गाताना सौ. उत्तरा केळकर.

Pimpri Crime : इलेक्ट्रिसिटी बोर्डातून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 69 हजारांची फसवणूक

दरम्यान कार्यक्रमाच्या मध्यात कलाकारांचा शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. देवस्थानचे विश्वस्त विनोद पवार, हभप आनंदजी तांबे, जितेंद्र देव यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये गायिका उत्तरा केळकर, गायक हेमंत वाळुंजकर, हार्मोनियम  –  डॉ. नरेंद्र चिपळूणकर, तबला व ढोलकी – राजेंद्र दूरकर  वेस्टर्न ऱ्हिदम – ऋतुराज कोरे, साईड ऱ्हिदम – राजेंद्र साळुंके, सिंथेसायझर – अमृता दिवेकर, ओंकार पाटणकर यांचा त्यामध्ये समावेश होता.
अभय गोखले यांच्या समयोचित निवेदनाला (Chinchwad News)  रसिकांनी चांगली दाद दिली.स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात नितीन दैठणकर यांचे पारंपरिक सनई चौघडा वादन झाले. त्यानंतर श्री गोंदवलेकर महाराज आरती मंडळाच्या वतीने सामूहिक आरती करण्यात आली. त्यानंतर सौ विद्या देव आणि नारायण लांडगे यांच्या सौजन्याने श्री सूक्त पठण झाले.  निखिल लुणावत यांच्या सौजन्याने आरोग्य आणि , दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. स्थानिक भजनी मंडळांनी भजन सेवा सादर केली. संत चरण रज श्री बाळकृष्ण महाराज वसंतगडकर आणि सहकाऱ्यांनी कीर्तन सेवा सादर केली. तसेच दिवसभर इतर धार्मिक कार्यक्रम झाले.


श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 461 व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. उत्तरा केळकर आणि सहकलाकारांचा सोमवारी (ता. 12) सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी रसिकांनी केलेली गर्दी.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.