Pimpri Crime : इलेक्ट्रिसिटी बोर्डातून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 69 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिसिटी बोर्डातून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीचे वीजबिल अपडेट करण्याच्या बहाण्याने क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत (Pimpri Crime) एक लाख 69 हजार 662 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 1 ऑगस्ट 2022 रोजी पिंपरी येथे घडली.

दीपक जगुमल तराणी (वय 47, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि.12) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akurdi News : श्री म्हाळसाकांत विद्यालयात विज्ञान प्रदर्शन, कला- क्रीडा महोत्सव उत्सहात साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला. त्यांचे वीजबिल भरले नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, असे त्या मेसेजमध्ये म्हटले होते.(Pimpri Crime) त्यानंतर आरोपीने तराणी यांना फोन केला. फोनवरील व्यक्ती इलेक्ट्रिसिटी बोर्डातून बोलत असल्याचे सांगून जुने वीजबिल अपडेट करायचे असल्याचा बहाणा करत त्याने तराणी यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. तराणी यांना क्विक सपोर्ट हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगत त्याआधारे तराणी यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख 69 हजार 662 रुपये ट्रान्सफर करत फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.