Akurdi News : श्री म्हाळसाकांत विद्यालयात विज्ञान प्रदर्शन, कला- क्रीडा महोत्सव उत्सहात साजरा

 एमपीसी न्यूज – ऱाष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत विद्यालय (Akurdi News) आकुर्डी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन , रांगोळी, चित्रकला प्रदर्शन या शैक्षणिक उपक्रमांचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे  यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष. राजेंद्र घाडगे  सहसचिव ए एम जाधव तसेच मंजूश्री पांढरे, नगरसेवक प्राचार्य सुनिल लाडके, खुशालदास गायकर, सुधीर रोकडे सिंधू मोरे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी कथ्थक नृत्य – रसिका बोरोले अकरावी के विज्ञान व 100 विद्यार्थ्यांनींनी योगासने प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय खोखो ,कबड्डी , रस्सीखेच या  क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या उपस्थित पाहूण्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत विजेते प्राप्त संघ व खेळाडूंना फिरता चषक व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. अटल टिंकरिंग लैब.  मधील विविध विषयावर मुलांनी 175 प्रकल्प सादर केले (Akurdi News) भारतीय मानक ब्युरो चे माहिती प्रदर्शनातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.स्काऊट गाईड विभागामार्फत टेंटची उभारणी करण्यात येऊन टेंट सजावट स्पर्धा घेण्यात आली विद्यालयातील 10 विद्यार्थी राजस्थान मध्ये जांबोरी शिबिरात सहभागी होणार आहेत.

Pimpri News : कोश्यारींचे पत्र म्हणजे महाराष्ट्रवासीयांच्या जखमेवर मीठ – काशिनाथ नखाते 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेमार्फत विविध स्पर्धा व सायकलिंग,सूर्यनमस्कार उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यनमस्कार घातले तसेच शरद करंडक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. जिल्हा स्तरीय स्पर्धेत अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी किर्ती बनसोडे, बनले शुभदा, दौंडकर शुभम यांची विभागीय पातळीवर निवड होऊन सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विज्ञान अटल लैब अगस्त्या लैब चित्रकला क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. अर्पिता चव्हाण -अकरावी के विज्ञान,(Akurdi News) दीक्षा ननवरे- अकरावी विज्ञान , सुप्रिती पाटील- अकरावी के विज्ञान  या मुलींनी तर प्रास्ताविक सुनिल लाडके यांनी केले कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य गायकर खुशालदास यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.