Pimpri News : कोश्यारींचे पत्र म्हणजे महाराष्ट्रवासीयांच्या जखमेवर मीठ – काशिनाथ नखाते 

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आपल्या राज्यपाल पदाची गरिमा व महत्त्व कमी करणारा बेताल वक्तव्य करणारा असा राज्यपाल कधी पाहिला नाही. (Pimpri News) महाराष्ट्र राज्यातील आणि देशासाठी प्रेरक असणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले,विद्यादात्री सावित्रीबाई फुले यांच्या बाबत वारंवार बेताल ,निराधार व चुकीचे वक्तव्य करून त्यांचा अपमान व बदनामी करण्याचा प्रयत्न राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वारंवार केला, आता त्यांनी सफाई म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महापुरुषांचा अनादर करण्याचा विचार माझ्या स्वप्नातही येत नाही असे म्हटले आहे.त्यांनी थोडी तरी लाज बाळगावी व थोतांड पत्रकबाजी न करता महाराष्ट्राची व महापुरुषांची माफी मागावी अन्यथा राज्यात आंदोलने सुरूच राहतील असा इशारा कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.

काही दिवसापूर्वी राज्यपालांनी समर्थ के बिना शिवाजी कौन पूछेगा ? असे म्हणत समर्थ रामदास आणि छत्रपतींचा कालावधी वेगवेगळ्या असताना त्यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांना गुरू संबोधण्याचे काम केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी उतुंग कार्य केलेल्या सावित्रीबाई व क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या विवाहबाबत अश्लील शब्द वापरले, त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केले यातून महापुरुषांचा व राज्याचा अपमान झालेला आहे म्हणून राज्याचे राज्यपाल म्हणून राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आजपर्यंत माफी अथवा दिलगिरी मागितली नाही यांचा संपुर्ण महाराष्ट्र राज्याने निषेध केलेला आहे.

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, गर्भपात नं केल्यास दिली जीवे मारण्याची धमकी

अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नसतानाही उलट गृहमंत्र्याना पत्र लिहून शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाहीतर संपूर्ण देशाचा गौरव आहे असे म्हणत कोरोना काळात कोणी बाहेर पडत नव्हते त्यावेळी मी शिवनेरी, सिंहगड ,रायगड, प्रतापगडासारख्या स्थळावर जाऊन दर्शन घेतल्याचे नमूद केले आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज हे अखंड विश्वाला प्रेरक होते.त्यांच्या चरणी नतमस्तक होणे अभिप्रेत आहेच , मात्र एवढा अपमान करून ही त्यांना छत्रपतींची व महाराष्ट्राची माफी मागावी वाटत नाही व त्याचा उल्लेख ही पत्रात नाही हे अत्यंत चिंताजनक असून आधी महाराष्ट्रवासीयांना जखम करायची व अशा प्रकारे माफी न मागता पत्रा चे नाटक करणे म्हणजे महाराष्ट्र वासियांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , नैशनलिस्ट ट्रेड युनियन ,कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे काढलेल्या पत्रकात कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.