Maval News : घराचे कुलुप तोडून एक लाखांची चोरी

एमपीसी न्यूज  – दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने घरातून एक लाख आठ हजार 575 रुपयांचा ऐवज चोरून नेला. (Maval News) ही घटना रविवारी (दि. 11) रात्री आठ ते सोमवारी (दि. 12) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे घडली.

भारत पांडुरंग जाधव (वय 42, रा. शेलारवाडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News : चिंचवड येथे रंगला बहारदार गीतांचा कार्यक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना आरोपीने दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. (Maval News) घरातून 6.9 तोळे सोन्याचे दागिने, तांब्याची भांडी व रोख रक्कम असा एकूण एक लाख आठ हजार 575 रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.