Nagpur : निरंकारी विवाह पद्धतीने 45 जोडपी विवाहबद्ध

एमपीसी न्यूज – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या ( Nagpur) उपस्थितीत सोमवार, 29 जानेवारी रोजी नागपुरच्या मिहान जवळ आयोजित केलेल्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या जागेवर एकूण 45 जोडपी विवाहबद्ध झाली.
 नव विवाहित वधूवरांना सदगुरु माताजींनी गृहस्थ जीवनासाठी आशीर्वाद  दिले . तसेच निरंकारी पद्धतीने साधे विवाह करण्याची निवड केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सामूहिक विवाह कार्यक्रमात वधूवरांनी पारंपारिक जयमाला (वरमाला) एकमेकांच्या गळ्यात घातल्या. याशिवाय निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सामायिक हार निरंकारी मिशनच्या प्रतिनिधींनी प्रत्येक जोडप्याला परिधान केले. लांवांच्या (मंगलाष्टका) दरम्यान सद्गुरु माताजी व राजपिताजी यांनी वधूवरांवर पुष्पवर्षाव करुन आपला आशीर्वाद प्रदान केला. त्याचप्रमाणे वधूवरांच्या कुटुंबियांनीही त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला.

याप्रसंगी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून एकूण 45 जोडपी विवाहबद्ध झाली. त्यामध्ये मुंबई, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, चंद्रपुर, चिपळूण (रत्नागिरी), धुळे, डोंबिवली, गडचिरोली, जालना, कोल्हापुर, नागपुर, पालघर, पुणे सोलापुर, ठाणे, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांतील वधूवरांचा समावेश होता.
सामूहिक विवाह संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था समागम स्थळावर करण्यात आली. या साध्या पद्धतीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात अनेक पदवीधर, पदव्यूत्तर पदवीधर तसेच उच्च शिक्षित नवजवान व नवयुवतींचा समावेश होता. काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करु शकले असते. परंतु सद्गुरुच्या  शिकवणीनुसार साध्या पद्धतीने ( Nagpur) विवाह करण्याचे एक आदर्श उदाहरण त्यांनी प्रस्तुत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.