Nagpur : 57व्या निरंकारी संत समागमाची अनेकतेत एकतेचे दर्शन घडविणारी शोभा यात्रा

एमपीसी न्यूज – जीवनात जेव्हा परमात्म्याचा बोध होतो तेव्हा आत्मा आणि परमात्म्याचे मिलन घडून येते (Nagpur) ज्यायोगे आपसुकच एकत्व स्थापित होते.  त्यानंतर जीवनात मानवी गुणांचा स्वाभाविकपणे प्रवेश होतो, ”असा संदेश सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी  महाराष्ट्राच्या 57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या शुभारंभ प्रसंगी दिला.

या तीन दिवसीय भव्य संत समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण आणि इतर प्रभुप्रेमी भाविक सहभागी झाले आहेत.प्रजासत्ताक दिनाचा उल्लेख करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाचे संविधान लागू करण्यात आले. अशाच प्रकारे जर मनुष्य मानवीय गुणांचे एखादे संविधान तयार करुन आपल्या जीवनात लागू करेल तर खरोखरच हे जीवन जगण्यायोग्य होऊ शकेल.

असे झाले तर मनुष्य द्वेष व भेदभावांचा त्याग करुन प्रेम-नम्रता यांसारख्या दैवी गुणांचा अंगीकार करुन वास्तविक मनुष्य बनून एकमेकांचा सत्कार करु लागेल. केवळ पुस्तकी ज्ञानाने नव्हे तर प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानाद्वारे संपूर्ण ब्रह्माडाच्या कणाकणात व सर्वांभूती असलेल्या परमात्म्याला पाहूनच मनुष्य मानवतेचा व्यवहार करु शकेल, असे प्रतिपादन सद्गुरु माताजींनी केले.

शोभा यात्रा

आज सकाळी नागपुरच्या सुमठाणा, हिंगणा स्थित प्रसिद्ध मिहान एसईझेड व पतंजली फूड फॅक्टरीलगतच्या विशाल मैदानांवर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य आगमनाप्रित्यर्थ भाविक भक्तगणांनी एक भव्य शोभायात्रा आयोजित केली होती.

ज्यामध्ये एका बाजुला भक्तगणांनी आपल्या हृदयसम्राट सद्गुरुचे सजल नेत्रांनी भावपूर्ण स्वागत केले. शोभायात्रेमध्ये मिशनच्या शिकवणूकीवर आधारित देश-विदेशातील वेगवेगळ्या संस्कृती व परंपरांचे सुरम्य मिलन झाल्याचे अनुपम दृश्य पहायला मिळाले.

Pune : पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो सोने डीआरआयने केले जप्त

या शोभा यात्रेमध्ये महाराष्ट्र अनेक शहरांतून व गावखेड्यांतून आलेल्या श्रद्धाळू भक्तांनी गीत, संगीत, नृत्य व चित्ररथ इत्यादिच्या माध्यमातून आपल्या कलेचे प्रदर्शन करत सद्गुरु माताजींचे पावन आशीर्वाद प्राप्त केले. महाराष्ट्रातील नागपुर, डोंबिवली, पुणे, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, वडसा या भागांच्या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, छत्तीसगड व गुजरात इत्यादि ठिकाणाहून आलेल्या भक्तगणांनी विविध लोकनृत्ये व चित्ररथाच्या माध्यमातून ब्रह्मज्ञान, प्रेम, सेवा व एकत्व यांसारख्या विषयांना अभिव्यक्ती प्रदान केली.

शोभा यात्रेच्या अंतिम टप्प्यात दिव्य युगुलदेखील शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. त्यावेळी समागम समितीचे सदस्य आणि मंडळाचे केंद्रीय अधिकारी यांनी त्यांच्या पालखीसमवेत राहून त्यांना समागम पंडालमध्ये मुख्य मंचापर्यंत नेण्यात आले.

प्रथम दिवसाच्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ.मोहन भागवत यांचेही आगमन झाले. त्यांनी सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांची भेट घेतली आणि निरंकारी भक्तांना सत्यरूपी परमात्मा व आपल्या सद्गुरुवर निष्ठा व विश्वास बाळगण्याची प्रेरणा दिली. अन्य कित्येक अनुयायांनी देखील गीत, कविता आणि व्याख्यानाच्या माध्यमातून समागमाचा विषय शांती – अंतर्मनाची या विषयावर आपले भाव व्यक्त (Nagpur) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.