Hinjawadi : आयटी अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये आयटीआय (Hinjawadi) अभियंता महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे.
वंदना द्विवेदी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ निगम याला पोलिसांनी अटक केली आहे.

Nagpur : 57व्या निरंकारी संत समागमाची अनेकतेत एकतेचे दर्शन घडविणारी शोभा यात्रा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वंदना आणि ऋषभ हे दोघेही लखनऊ येथील आहेत. ते हिंजवडी आयटी पार्क मध्ये नोकरीस होते. मागील दोन दिवसांपासून दोघेही हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये राहत होते. दरम्यान ऋषभ याने वंदना यांचा रविवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला.
खून केल्यानंतर ऋषभ मुंबईच्या दिशेने जात होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये तो पिस्तुलासह आढळला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत (Hinjawadi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.