Nagpur : नागपूर नगरीत होणार महाराष्ट्राचा 57 वा निरंकारी संत समागम

एमपीसी न्यूज –   निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या ( Nagpur ) पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राच्या 57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक 26,27 व 28  जानेवारी, 2024 दरम्यान नागपूर येथे करण्यात येणार आहे. मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हाच या संत समागमाचा उद्देश आहे.

 या भव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी ‘स्वेच्छा सेवांचे’ विधिवत उद्घाटन परम आदरणीय मोहन छाबड़ा, मेंबर इंचार्ज, प्रचार प्रसार, संत निरंकारी मंडळ यांच्या शुभहस्ते रविवार, दि.24 डिसेंबर रोजी नागपूरसह संपूर्ण विदर्भ तसेच पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत हर्षोल्हासपूर्ण वातावरणात करण्यात आले.

Chinchwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना विचारवंत गप्प – डॉ. बाबा आढाव

या प्रसंगी मंडळाच्या वित्त विभागाचे मेंबर इंचार्ज  जोगिंदर मनचंदा, डॉ.दर्शन सिंह, कॉर्डिनेटर, प्रचार प्रसार, समागम समितीचे चेअरमन   शंभुनाथ तिवारी, समन्वयक   किशन नागदेवे, सेवादलचे केन्द्रीय अधिकारी सर्वश्री गुलेरिया आणि सुरेंद्र दत्ता आदि मान्यवर उपस्थित होते. समागम समितीच्या इतर सदस्यांसह राज्यभरातील सेवादलाच्या क्षेत्रीय संचालकांनी सेवादल स्वयंसेवकांसह या समारोहामध्ये भाग घेतला.

 स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी पूज्य श्री मोहन छाबड़ा जी यांनी आपले भाव व्यक्त करताना म्हटले, की सद्गुरूच्या असीम कृपेने यावर्षी नागपूर नगरीत महाराष्ट्राचा 57 वा वार्षिक निरंकारी संत समागम आयोजित होत असून केवळ नागपूरमधीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भाविक भक्तगणांसाठी  सेवेची ही एक अमूल्य संधी प्राप्त झालेली आहे.

ते पुढे म्हणाले, की अशा प्रकारच्या संत समागमांचे आयोजन सद्गुरुच्या दिव्य दृष्टीकोनानुसार मानवाला मानवाशी जोडण्यासाठी केले जात असते. मनुष्य जेव्हा आपले नाते ईश्वराशी जोडतो तेव्हा तो सहजपणे समस्त भेदभावांच्या पलिकडे जातो आणि विश्वबंधुत्वाच्या धाग्यात गुंफला जातो. समागमाचे हे पर्व मानवाला ब्रह्मानुभूतीद्वारे आत्मानुभूती करुन स्वत:चा दर्जा उंचावण्याची सुसंधी प्रदान करत असते ज्यायोगे मनुष्य स्वत: सुंदर जीवन जगून धरती साठी सुद्धा एक वरदान ( Nagpur ) बनून जातो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.