Chikhali : भक्ष्याच्या शोधात आला होता बिबट्या; वनविभागाचे निरीक्षण

एमपीसी न्यूज – चिखली येथे दाट लोकवस्तीमध्ये गुरुवारी (दि. 28) सकाळी (Chikhali) आढळलेला बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला असल्याचे निरीक्षण वनविभागाकडून नोंदवण्यात आले आहे. वन विभागाचे कर्मचारी दोन तास बिबट्याचा पाठलाग करीत होते. अखेर त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

चिखली येथे गुरुवारी पहाटे बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. रस्त्यावर, घरासमोर, गोठ्यात आणि नंतर शेतात असा त्याने सर्वत्र वावर केला. सकाळी सव्वा सहा वाजता वन विभागाला चिखली येथे बिबट्या आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हवेली वनपरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी आणि बावधन येथील रेस्क्यू टीम चिखली येथे दाखल झाली.

Nagpur : नागपूर नगरीत होणार महाराष्ट्राचा 57 वा निरंकारी संत समागम

सुदाम मोरे यांच्या घराशेजारी असलेल्या त्यांच्या ज्वारीच्या शेतात पाठलाग करून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केले. त्याला बावधन येथील वनविभागाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्याच्यावर पुढील काही दिवस निगराणी ठेवली (Chikhali) जाणार आहे. त्याच्या हालचाली आणि प्रकृतीची खात्री करून त्याला मोठ्या जंगलात सोडले जाणार आहे.

बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत सहभागी झालेले वनरक्षक कृष्णा हाके म्हणाले, “गवतावर जगणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अशा प्राण्यांची शिकार करून जगणारे बिबट्यासारखे प्राणी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. चिखली येथील बिबट्या देखील अशाच प्रकारे भक्ष्याच्या शोधात आला असावा.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.