Alandi News : आळंदी मध्ये मैत्री करूया गणिताशी या गणित साहित्य प्रदर्शनाचे विनया तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज : दरवर्षी भारतामध्ये 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून (Alandi News) विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध गणितीय प्रतिकृती, मनोरंजक खेळ ,गणित रांगोळी इत्यादींचे ” मैत्री करूया गणिताशी”  या  गणित साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते .या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व माजी नगरसेविका विनया तापकीर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनात 35 विविध गणित प्रकल्प आणि 15 गणिती रांगोळ्यांचे रेखाटन करण्यात आले होते.या कार्यक्रमा वेळी विनया तापकीर ,संस्थेचे सचिव अजित वडगांवकर,इंद्रायणी शिक्षण संस्था अध्यक्ष तुकाराम गवारी,प्राचार्य दीपक मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थी मनोगतामध्ये पुनम जोरी विद्यार्थिनीने रामानुजन यांचा जीवनपट सांगितला. तसेच भक्ती बनकर मधील विद्यार्थिनीने मनोरंजक गणिती उखाणे घेऊन सर्वांचे मनोरंजन केले. विद्यार्थिनींनी अमीर शेख यांनी  रचलेल्या गणित गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर राष्ट्रीय गणित दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा गणित विज्ञान अध्यापक संघ आयोजित “पुणे टॅलेंट सर्च” एक्झामिनेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत इयत्ता दहावीचे 88 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

Pune News : पुणे- मुंबई महामार्गावर टेम्पो पलटल्याने चालकासह 2 जण जखमी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकला वाघमारे यांनी केले, प्रास्ताविक अनुजायिनी राजहंस यांनी केले, आभार लिना नेमाडे यांनी मानले. त्याचबरोबर गणित विभागातील सर्व शिक्षक अनुराधा खेसे, सायुज्यता तायडे, संदीप वालकोळी ,अतुल भांडवलकर, उज्वला कडलासकर, होवाळ सर (Alandi News) या सर्वांनी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. विशेष म्हणजे गणितीय मॉडेल तयार करण्यासाठी राजेंद्र सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, उद्योगपती तानाजी चौधरी ,शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.