Pune News : पुणे- मुंबई महामार्गावर टेम्पो पलटल्याने चालकासह 2 जण जखमी

एमपीसी न्यूज : पुणे- मुंबई हायवे वर पिकअप टेम्पो पलटल्याने चालकासह 2 जण जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी 22 डिसेंबर रोजी घडली आहे

आज 22 डिसेंबर रोजी दुपारी 4:25 वाजताच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर  सायमाळ गावच्या हद्दीत अपघात झाला. या दुर्घटनेनंत  बोरघाट केंद्राचे महामार्ग पोलीस उप निरीक्षक अनिल शिंदे व टिम तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

Covid 19 : मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करा, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन

पिकअप टेम्पो (MH 05 EL 0068) हा पुणे ते खोपोली जुन्या हायवेने जात असताना या ठिकाणी आल्यानंतर उतारावर पिकअपचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे पिकअप वरील नियंत्रण सुटल्याने  पलटी होऊन हा अपघात घडला . या अपघातात पिकअप चालक श्रीमंत बोडखे, वय 31 वर्षे, रा. कल्याण व सोबत असलेले शरद शिंदे आणि अन्य एक यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठविले आहे. अपघातग्रस्त पिकअप रोडच्या बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.