Ravet News : राष्ट्रीय रोबोकॉप स्पर्धेत रेस्क्यू मेझ गटात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज –   पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे  या वर्षीच्या राष्ट्रीय रोबोकॉप ज्युनिअर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला प्रथम क्रमांक मिळाला आहे. (Ravet News) फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातून 60 संघांमधून 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय स्पर्धेतील विजयी संघांना जुलै 2023 मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय  रोबोकॉप  ज्युनिअर स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

Mahavitaran : महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सांस्कृतिक स्नेहमेळावा संपन्न

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक : एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, पुणे (रावेत); तृतीय क्रमांक पारितोषिक : ग्रीनवुड हाय इंटरनॅशनल स्कूल, सर्जापूर; या स्पर्धेतील ऑन स्टेज प्रकारात देखील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलने सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा  पुरस्कार पटकावला. एलएससीएल बेंगळुरूचे संचालक डेव्हिड प्रकाश, जपान एससीसीआयपीचे सीइओ किकुची सॅन, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त  हर्षवर्धन पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले व जुलै मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेचे परीक्षण अभियांत्रिकी, संशोधन, स्टेम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ञ प्राध्यापकांनी केले.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
रेस्क्यू लाइन गट :- प्रथम : रोबोलेक्ट्रो टीम स्टुडिओ, द्वितीय : शिव नाडर स्कूल, नोएडा, तृतीय : शिव नादर स्कूल, गुडगाव;
ऑन स्टेज गट :- प्रथम : ग्रीनवुड हाय इंटरनॅशनल स्कूल, सर्जापूर, द्वितीय : बीजीएस वर्ल्ड स्कूल, चिकबल्लापुर, तृतीय : बीजीएस वर्ल्ड स्कूल, नागरूर;
सॉकर गट :- प्रथम : शिव नादर स्कूल, फरीदाबाद,
द्वितीय : शिव नादर स्कूल, फरीदाबाद, तृतीय : शिव नादर स्कूल, गुडगाव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.