National Suvarna Ratna : राष्ट्रीय सुवर्णरत्न जीवनगौरव पुरस्काराने मातृसेवाचे सुहास गोडसे यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – नुकताच ठाणे येथे राष्ट्रीय सुवर्णरत्न (National Suvarna Ratna) जीवनगौरव पुरस्कार – 2022 हा पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रीय सांस्कृतिक, कला, किडा, सांस्कृतिक अकादमी, ठाणे यांच्यावतीने राष्ट्रीय सुवर्णरत्न जीवनगौरव पुरस्काराने पुणे -चिंचवड येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेचे चेअरमन सुहास उद्धव गोडसे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वरभास्कर अजित कडकडे व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू जयंत परब उपस्थित होते व यांच्या हस्ते डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात हा सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध अभिनेते मिली दास्ताने हे देखील यावेळी उपस्थित होते.

अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्याला अटक

पुरस्काराबद्दल गौरवोदगार काढताना अजित कडकडे म्हणाले, समाजाची बांधिलकी जपणारे प्रामाणिक लोक फार कमी असतात व अशा लोकांना प्रेरणा देणारे लोकही कमी असतात. स्वत:च्या घरात एक व्यक्ती आजारी असल्यावर या सेवेचे मोल कळते. गोडसे यांची संस्था या लोकांसाठी मोठा वरदान ठरेल. आपुलकी, जिव्हाळा, लुप्त झाले आहेत. अशा निराशाजनक आणि विदारक परिस्थितीत आशेचा किरण ठरणारी संस्था म्हणजे मातृसेवा… मरण नजरेसमोर दिसत असणाऱ्या असाह्य व्यक्तींना आपलेपणाने सेवाश्रूषा करत त्यांना शारीरिक, मानसिक आधार देऊन, जगण्याची उमेद वाढविणारे कमी वयात सेवेचा वारसा घेणारी संस्कृती गोडसे, रात्रदिवस मेहनत घेऊन रूग्णांच्या हाल अपेष्टा कमी करणारा देवदूत म्हणजे सुहास गोडसे यांच्या कार्यास माझे शुभ आशिर्वाद.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साक्षी परब यांनी केले. सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक बी. एन.खरात यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.